ETV Bharat / business

टिकटॉकसह चिनी अ‌ॅपवरील बंदी कायम राहणार

author img

By

Published : Jan 23, 2021, 8:56 PM IST

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसचे बंदी लागू केलेल्या अ‌ॅपकडून अवलोकन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नोटीस पाठविली आहे, याला टिकटॉकने दुजोरा दिला आहे.

टिकटॉक न्यूज
टिकटॉक न्यूज

नवी दिल्ली - केंद्र सरकारने बंदी लागू केलेल्या टिकटॉकसह चिनी अ‌ॅपला नोटीस बजाविली आहे. या अ‌ॅपवरील बंदी यापुढेही सुरू राहणार असल्याचे सरकारने नोटीसमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसचे बंदी लागू केलेल्या अ‌ॅपकडून अवलोकन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नोटीस पाठविली आहे, याला टिकटॉकने दुजोरा दिला आहे. टिकटॉकने म्हटले की, नोटीसचे आम्ही अवलोकन करत आहोत. या नोटीस योग्य उत्तर दिले जाईल. केंद्र सरकारने २९ जून २०२० ला दिलेल्या निर्देशांचे पहिल्यांदा टिकटॉक कंपनीने पालन केले आहे. आम्ही स्थानिक कायदा आणि नियमांचे पुढेही पालन करणार आहोत. केंद्र सरकारच्या ज्या चिंता आहेत, त्या दूर करण्यासाठी उत्तम प्रयत्न करणार आहोत. आमच्या सर्व वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता यांना आमचे सर्वाधिक प्राधान्य असल्याचे टिकटॉकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-हरियाणातील कंपनीकडून ३१ लाख गुंतवणुकदारांना चुना; ईडीकडून आरोपपत्र दाखल

जूनमध्ये केंद्र सरकारने चिनी अ‌ॅपवर बंदी केली होती लागू-

दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमपणाला धोका होत असल्याने ५९ चिनी अ‌ॅपवर जून २०२० मध्ये बंदी लागू केली. तर आणखी १८८ चिनी अ‌ॅपवर सप्टेंबर २०२० बंदी लागू केली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अ‌ॅपवर बंदी लागू केल्याने देशात हे अ‌ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत.

हेही वाचा-अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी अधिक तरतूद करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.