नवी दिल्ली - वापरकर्त्यांचे व्यवहार अधिक सुरक्षित होण्याकरिता कंपनीकडून गुगल पे नवीन बदल करणार आहे. या बदलानुसार वापरकर्त्याला आर्थिक व्यवहाराच्या माहितीचे नियोजन करता येणार आहे.
वापरकर्त्यांना 'गुगल पे'मधील आर्थिक व्यवहाराची आकडेवारी काढून टाकता येणार आहे. तसेच 'गुगल पे' मधील माहिती वैयक्तीकरणामधून काढण्याचा पर्यायही देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून 'गुगल पे' अॅप सेटिंगमधील बदल करण्याचे पर्याय वापरकर्त्यांना मिळणार असल्याचे गुगल पेच्या उपाध्यक्ष (उत्पादन) अंबरीश केंघे यांनी सांगितले. 'गुगल पे'मध्ये वैयक्तीकरणातून वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळणार आहे. उदाहरणार्थ वापरकर्त्याला अधिक ऑफर आणि बक्षीस मिळू शकणार आहेत.
हेही वाचा-आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करून १४ वर्षांच्या मुलाला दिले पुनर्जीवन
जे वापरकर्ते 'गुगल पे' हे अँड्राईड आणि आयओएसवर अपडेट करणार आहेत, त्यांना नवीन फीचरचा लाभ घेता येणार आहे. तुमची वैयक्तिक माहिती कधीही दुसऱ्यांना विकण्यात येत नसल्याचे गुगलने म्हटले आहे. तसेच आर्थिक व्यवहाराची माहितीही गुगलच्या उत्पादनांसाठी आणि जाहिरातीसाठी वापरण्यात येत नसल्याचेही गुगल पेने म्हटले आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेन प्रकरणात तपास यंत्रणा 'त्या' इनोव्हाच्या शोधात