नवी दिल्ली - राजधानीमध्ये एका ऑनलाईन फूड सेवा देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऑनलाईन फूड व्यवसायावर परिणाम झाला आहे. दिवसभरात डिलिव्हरीचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने डिलिव्हरी कर्मचारी करणाऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने ग्राहकांकडून ऑनलाईन फूड मागविण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. आकाश गुप्ता या डिलिव्हरी कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही जरी काळजी घेत असलो तरी ऑनलाईन फूड मागविण्यासाठी कोणीही इच्छूक नाही. आम्ही केवळ गेटवर ऑनलाईन फूड देत आहोत. ग्लोज आणि सॅनिटायझरचा वापर करत आहोत. कंपनीकडून रोज आमचे तापमान पाहिले जात आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: सुंदरम फास्टनर्सची तामिळनाडूला ३ कोटींची मदत
दोन आठवड्यापूर्वी एका डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मालवीय नगरमधील ७२ कुटुंबांना घरातच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. याशिवाय १७ डिलिव्हरी बॉयलाही संस्थात्मक विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा-रिलायन्सच्या 'मिशन अन्न सेवा' कार्यक्रमांतर्गत 3 कोटी नागरिकांना खाण्या-पिण्याची सोय