ETV Bharat / business

आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची केंद्रीय अर्थमंत्री आज करणार घोषणा

निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांसाठी अन्नधान्य, एक देश, एक रेशनकार्ड, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज अशा घोषणा गुरुवारी पॅकेजमध्ये केल्या आहेत.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : May 15, 2020, 11:54 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा आज सायंकाळी ४ वाजता करणार आहेत. सीतारामन यांनी गुरुवारी स्थलांतरित मजूर, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते, लघू व्यापारी व लहान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा केल्या आहेत.

निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांसाठी अन्नधान्य, एक देश, एक रेशनकार्ड, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज अशा घोषणा गुरुवारी पॅकेजमध्ये केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण जीडीपीच्या दहा टक्के म्हणजे सुमारे २० लाख कोटींचे पॅकेज देण्यात येणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. यामध्ये गरिबांना १.१७ लाख कोटींच्या पॅकेजचा समावेश आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनाची तरलता वाढविण्यासाठी ५.६ लाख कोटींचे जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश आहे.

संबंधित बातमी वाचा-

निर्मला सीतारामन यांनी वित्तीय पॅकेजच्या पहिल्या टप्प्यात ५.९४ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये लघू उद्योजकांना ३ लाख कोटींचे कर्ज देण्याचाही समावेश आहे. हे पॅकेज अर्थसंकल्पातील तरतुदींशिवाय असलेल्या आर्थिक उपाययोजना आहेत. टाळेबंदीमुळे नुकसान झालेल्या विविध क्षेत्रातील घटकांना दिलासा देणे हा पॅकेजचा उद्देश आहे.

कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्र आणि समाजातील घटकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. टाळेबंदीने गाळात रुतणारी अर्थव्यवस्था आणि संकटात असलेल्या घटकांसाठी सीतारामन काय घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.