ETV Bharat / business

खूशखबर ! सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट देणार १ लाख ७० हजार नोकऱ्या - फ्लिपकार्ट नोकरी न्यूज

आगामी सणादरम्यान ऑनलाइन खरेदी वाढेल, अशी फ्लिपकार्टला अपेक्षा आहे. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी फ्लिपकार्टकडून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ सेवेत घेतले जाणार आहे.

फ्लिपकार्ट
फ्लिपकार्ट
author img

By

Published : Sep 15, 2020, 1:27 PM IST

बंगळुरू - कोरोनाने आणि टाळेबंदीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्याने रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे. अशा परिस्थितीत दिलासादायक बातमी आहे. फ्लिपकार्ट सणासुदीच्या काळात ७० हजार जणांना प्रत्यक्ष तर, १ लाख जणांना अप्रत्यक्ष स्वरुपात नोकऱ्या देणार आहे.

फ्लिपकार्टच्या प्रत्यक्ष नोकऱ्या या पुरवठा साखळीत आहेत. यामध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव, पिकर्स, पॅकर्स आणि सॉर्टर्सची पदे आहेत. तर, फ्लिपकार्टचे भागीदार असलेल्या कंपन्यांकडून विविध ठिकाणी अप्रत्यक्ष नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेतील महागाईत ऑगस्टमध्ये अंशत: घसरण

फ्लिपकार्टची मालकी असलेल्या ई-कार्ट व मार्केटप्लेस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा म्हणाले, की आम्ही परिणामकारक भागीदारी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामधून ग्राहकांना चांगला अनुभव मिळू शकणार आहे. संपूर्ण इकोसिस्टमची प्रगती करण्यासाठी अतिरिक्त संधी निर्माण करण्यात येत आहे. त्याचा उपयोग बिग बिलियन डेजलाही होणार आहे.

हेही वाचा-दिलासादायक वृत्त.. 'ही' कंपनी देणार ३० हजार हंगामी नोकऱ्या

५० हजार किराणांमधून हजारो हंगामी डिलिव्हरी आणि पॅकेजिंगच्या नोकऱ्या मिळणार आहेत. विक्रेत्यांचा व्यवसाय आणि रोजगार वाढवून आम्ही उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा भाग बनत आहोत. फ्लिपकार्टकडून प्रत्यक्ष नोकऱ्या देण्यासाठी विविध विभागांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ग्राहकांना जीएसटीएनची बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.