नवी दिल्ली - फेसबुक इंडियाच्या प्रमुख अन्खी दास यांनी संसदीय समितीला व्हॉट्सअॅप हेरगिरीप्रकरणी अहवाल सादर केला. समाज माध्यमात एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असल्याचे कंपनीने म्हटले अहवालात आहे.
स्थायी समितीच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सायबर सुरक्षातज्ज्ञांना बैठकीसाठी बोलाविले होते. नागरिकांची माहिती सुरक्षा व गोपनीयतेवर त्यांचे विचार जाणून घेतले. एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनच्या नियमाचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचा दावा फेसबुक इंडियाच्या प्रमुख अन्खी दास दास यांनी केला.
दूरसंचार सचिव अंशू प्रकाश आणि गृह मंत्रालयाचे अधिकारीही समितीच्या बैठकीला हजर राहिले. समितीने साक्षीदार म्हणून भाजपचे माजी सचिव गोविंदाचार्य यांना नोटीस बजावली होती. गोविंदार्चाय हे वकिलासमवेत बैठकीला उपस्थित राहिले. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपचे प्रतिनिधी, दूरसंचार विभागाचे अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित राहिले.
हेही वाचा-मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका
शशी थरुर म्हणाले, सायबर सुरक्षा हा आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे. निश्चितच आपण नियमानुसार जाणार आहोत. सरकारकडून आपण स्पष्टीकरण मागणार आहोत.
हेही वाचा-अदानी ट्रान्समिशनला महाराष्ट्रात विद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी
काय आहे फेसबुक हेरगिरी प्रकरण?
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपमधून देशातील काही पत्रकार व मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या मोबाईलची हेरगिरी झाली होती. त्यासाठी इस्त्राईलच्या कंपनीने पीगस या स्पायवेअरचा वापर केला होता. व्हॉट्सअॅपने इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपवर अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल केला.