ETV Bharat / business

फेसबुकचे येणार क्रिप्टोचलन ! स्वित्झर्लंडमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू - Bitcoin

विशेष म्हणजे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यानेदेखील 'हॉवर्ड लॉ'च्या प्राध्यापकांना दिलेल्या मुलाखतीत ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते.  विकेंद्रीकरण अथवा ब्लॉकचेनला अधिकृतपणा देण्याबाबत विचार करत असल्याचे मार्कने म्हटले.

बिटकॉईन
author img

By

Published : May 19, 2019, 7:17 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - इंटरनेटविश्वात आभासी चलन असलेल्या क्रिप्टोचलनाच्या व्यवसायात फेसबुकदेखील उतरणार आहे. त्यासाठी स्वित्झर्लंडमधील लिब्रा नेटवर्क ही कंपनी पेमेंट व्यवस्थेसह ब्लॉकचेन यंत्रणा फेसबुकसाठी विकसित करणार आहे.

फेसबुकचे क्रिप्टोचलन हे डॉलरशी संलग्न असणार आहे. त्यामुळे ते स्थिर राहणार असून बिटकॉईनसारखे ढासळणार नाही, असे अमेरिकेतील माध्यमाने म्हटले आहे.

असा आहे लिब्रा कंपनीचा प्रकल्प-
फेसबुकने काही आठवड्यापूर्वी लिब्रा नेटवर्कची जीनिव्हामध्ये सुरुवात केल्याचे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले होते. लिब्रा हा फेसबुकचा अंतर्गत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून डिजिटल चलन विकसित केले जाणार असल्याचे वृत्तात म्हटले होते. लिब्रा कंपनीकडून डिजिटल चलनासाठी लागणारे पेमेंट, ब्लॉकचेन, अॅनालिटीक्स आणि बिग डाटा विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअर व हार्डवेअरदेखील विकसित करण्यात येणार आहे. फेसबुक सुमारे १२ वित्तीय संस्था आणि ऑनलाईन मर्चंटस नोकरीत घेत असल्याचे अमेरिकेतील माध्यमाने यापूर्वी म्हटले होते. तर दुसऱ्या एका माध्यमानेदेखील फेसबुकची ५० जणांची टीम आभासी चलनावर काम करत असल्याचे म्हटले होते. यावर फेसबुकने प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्लॉकचेनबाबत मार्कने ही दिली होती प्रतिक्रिया -
विशेष म्हणजे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यानेदेखील 'हॉवर्ड लॉ'च्या प्राध्यापकांना दिलेल्या मुलाखतीत ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते.
विकेंद्रीकरण अथवा ब्लॉकचेनला अधिकृतपणा देण्याबाबत विचार करत असल्याचे मार्कने म्हटले. त्याबाबत नेमके कोणत्या पद्धतीने करायचे हे निश्चित केलेले नाही. मात्र अधिकृतपणा देण्यासाठी विविध सेवांचा वापर होवू शकतो, असे मार्कसने स्पष्ट केले होते.

फेसबुकचे जगभरात २३८ कोटी वापरकर्ते आहेत. फेसबुकने क्रिप्टोचलनाची सुरुवात केल्यास अनेक ऑनलाईन व्यवहार वापरकर्त्यांना करता येणे शक्य होणार आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.