नवी दिल्ली - देशात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २६ क्रियाशील औषधी घटक आणि फॉर्म्युलेशन्सच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत.
क्रियाशील औषधी घटक (एपीआय) आणि फॉम्युलेशन्सच्या निर्यातीसाठी विदेश व्यापार महासंचालनालयाकडून कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. आजपासून तातडीने औषधी घटकांच्या निर्यातीवर बंधन लागू होणार आहे. यामध्ये पॅरासेटेमॉल, जीवनसत्व बी१ आणि बी १२ इत्यादींचा समावेश आहे.
हेही वाचा-दिल्ली, हैदराबादमध्ये कोरोना पोहचल्याने सरकार सतर्क, उपाययोजना राबवण्यास सुरुवात
केरळमध्ये तीन रुग्ण आढळल्यानंतर आता पहिल्यांदाच केरळबाहेर दिल्ली आणि हैदराबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे जगभरात सुमारे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.