नवी दिल्ली - तुमच्या पगारामधून पीएफ कपात होत असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) व्याजदर हा ८.६५ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आला आहे. हा व्याजदर चालू आर्थिक वर्षासाठी असणार असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी माध्यमांना सांगितले.
पीएफच्या व्याजदर कपातीचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफओ) उच्चस्तरीय असलेल्या सीबीटीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे संतोष गंगवार यांनी सांगितले. ईपीएफओने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ८.६५ टक्के व्याजदर दिला होता. या कालावधीत पीएफचे सुमारे सहा कोटी सभासद होते.
हेही वाचा-औषधांचा परवडणाऱ्या दरात पुरेसा पुरवठा करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
पीएफच्या व्याजदराला केंद्रीय वित्त मंत्रालयाची मंजुरी लागणार आहे. पीएफचे व्याजदर हे लघू बचत योजनांशी संलग्न असावेत, अशी केंद्रीय वित्त मंत्रालयाने कामगार मंत्रालयाकडे विनंती केली होती. ईपीएफओने त्यांच्या सभासदांना आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये ८.६५ टक्के व्याजदर दिला आहे. तर आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के व्याजदर होता.
हेही वाचा-यंदा खासगी कंपन्यांमध्ये किती होणार वेतनवाढ; जाणून घ्या सर्व्हेमधील माहिती