मुंबई - देशांतर्गत विमान वाहतूक प्रवाशांच्या संख्येत जानेवारीत गतवर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये देशांतर्गत ७६ लाख प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला आहे. तर जानेवारी २०२० मध्ये १.७ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केल्याचे इक्राच्या अहवालात म्हटले आहे.
जानेवारी २०२१ मधील देशांतर्गत विमान प्रवाशांचे प्रमाण हे डिसेंबर २०२० च्या तुलनेने ३.५ टक्क्यांनी घसरले आहे. कोरोना महामारीत लागू केलेली खुली होताना देशातील विमान वाहतूक क्षेत्रात सुधारणा होत आहे. मात्र, या सुधारणेचा वेग कमी इक्राचे उपाध्यक्ष किंजल शाह यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- सलग पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक; सोन प्रति तोळा ९४ रुपयांनी महाग
जानेवारी २०२१ मध्ये साधारणत: दररोज २,१९० विमानांचे उड्डाणे झाली आहेत. तर जानेवारी २०२० मध्ये साधारणत: दररोज ३,०८० विमानांचे उड्डाणे झाली आहेत. जानेवारी २०२१ मध्ये विमान उड्डाणामागे सरासरी १११ प्रवासी होते. तर जानेवारी २०२० मध्ये विमान उड्डाणामागे सरासरी १३४ प्रवासी होते. येत्या काळात विमान वाहतुकीत सुधारणा होईल, असा विश्वास इक्राचे उपाध्यक्ष किंजल शाह यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-देशातील स्टीलच्या किमतीत १० टक्के घसरण होईल-इक्राचा अंदाज
दरम्यान, देशांतर्गत विमान वाहतूक ८० टक्के क्षमतेने करण्याची परवानगी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०२० मध्ये दिली आहे. यापूर्वी विमान वाहतूक ७० टक्के क्षमतेने केंद्राने परवानगी दिली होती.
महामारीमुळे देशांतर्गत विमान सेवा होती ठप्प
कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात केंद्र सरकारने मार्चमध्ये टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवा ही २५ मार्चपासून स्थगित करण्यात आली होती. ही सेवा २५ मेपासून पूर्ववत करण्यात आली आहे.