नवी दिल्ली- कोरोनाच्या लढ्यात मोठी दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही कोरोनाच्या डबल म्युटंटविरोधात (सार्स कोव्ह-२) प्रभावी असल्याचे आढळले आहे. ही माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिली आहे.
भारत बायोटेकने विकसित आणि निर्मिती केलेली कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी भारतासह जगभरातील अनेक देशांनी मान्यता दिली आहे. या लशीच्या क्षमतेबाबत माहिती देणारे ट्विट आयसीएमआरने केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, की आयसीएमआरच्या अभ्यासात कोव्हॅक्सिन ही सार्स कोव्ह-२ ला निष्प्रभ (न्यूट्रल) करत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास
आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) सार्स कोव्ह-२ या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळे आहे. यामध्ये युकेचा स्ट्रेन B.1.1., ब्राझीलचा स्टेन B.1.1.28 आणि दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन B.1.351 आहे. आयसीएमआर-एनआयव्हीने कोव्हॅक्सिन ही युकेमधील कोरोनाचा स्ट्रेन आणि ब्राझीलमधील कोरोनाचा स्ट्रेनला निष्प्रभ करत असल्याचे दाखवून दिले आहे.
हेही वाचा-लशीचा तुटवडा; भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे वाढविणार उत्पादन
भारत बायोटेक वर्षभरात 70 कोटी लशींचे करणार उत्पादन-
भारत बायोटेकने कोरोना लस कोव्हॅक्सिनची उत्पादनक्षमता वाढविली आहे. त्यामुळे भारत बायोटेककडून वर्षभरात 50 कोटी ऐवजी 70 कोटी लशींचे उत्पादन होऊ शकणार आहे. दरम्यान, 1 मे रोजीपासून देशात 18 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकला लशीच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने 1500 कोटी मंजूर केले आहेत. भारत बायोटेकने जुलैपर्यंत ९ कोटी डोस देणे सरकारला अपेक्षित आहे.