नवी दिल्ली - कोरोनाने अनेकांवर आर्थिक संकटही येण्याची भीती आहे. कारण देशातील ३.८ कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. यामधील ७० टक्के लोक हे पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील असल्याचे पर्यटन क्षेत्रातील संघटनेने म्हटले आहे.
कोरोनाने नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटिलिटी (एफएआयटीएच) संघटनेने म्हटले आहे. याचा परिणाम होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन म्हणून थेट रक्कम त्यांच्या खात्यावर हस्तांतरित करावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क पुन्हा वाढण्याची शक्यता
महामारीचा संपूर्ण देशात परिणाम होत असल्याने भारतीय पर्यटन उद्योग दिवाळखोरीत जात आहे. अनेक व्यवसाय बंद होत असून बेरोजगारी वाढत असल्याचे एफएआयटीएचने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-बांधकाम उद्योग ठप्प; पॅकेज देण्याची क्रेडाईची सरकारकडे मागणी
पर्यटन क्षेत्रात सुमारे ५.५ कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. पर्यटन क्षेत्रातील अनेक व्यवसायांचे उत्पन्न बुडत असल्याने १२ महिने मदत करण्यासाठी मनरेगाच्याधर्तीवर निधी उभा करावा, अशी संघटनेने पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.