ETV Bharat / business

महामारीचा फटका; आयटी सेवा क्षेत्राच्या वृद्धीदरात होणार 3 टक्के घसरण

author img

By

Published : Jul 13, 2020, 9:08 PM IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयटी सेवा क्षेत्राच्या नफ्यात घसरण होणार आहे. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल, असे इक्राने म्हटले आहे.

संग्रहित- आयटी कंपनी
संग्रहित- आयटी कंपनी

नवी दिल्ली – कोरोना महामारीचा देशातील आयटी सेवा क्षेत्राच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये आयटी सेवा क्षेत्राच्या वृद्धीदरात 3 टक्के घसरण होईल, असा अंदाज इक्रा या पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. यापूर्वी वृद्धीदर हा 6 ते 8 टक्के होईल, असा इक्राने अंदाज केला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयटी सेवा क्षेत्राच्या नफ्यात घसरण होणार आहे. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल, असे इक्राने म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांकडून घरातून काम करून घेत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांना मागणीच्या तुलनेत पुरवठा करताना आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. घरातून कर्मचाऱ्यांना कामाची परवानगी दिली असतानाही आयटी कंपन्यांनी एप्रिलमध्ये 90 ते 95 टक्के काम पूर्ण केले आहे. अमेरिकेने नवीन एच-वनबी व्हिसा आणि एल-वन व्हिसा देण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. त्याचा भारतीय आयटी सेवा क्षेत्रावर परिणाम होणार असल्याचेही इक्रानेही म्हटले आहे. भारतीय आयटी सेवा क्षेत्राकडून अमेरिका आणि युरोपमध्ये 80 टक्के निर्यात करण्यात येते. मात्र, या कोरोना महामारीमुळे बहुतांश देशांच्या विकासदराला मोठा फटका बसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.