नवी दिल्ली - नीती आयोगाने दुचाकीसह तीनचाकी २०२२ -२०२३ पर्यंत ईलेक्ट्रिक वाहनांमध्ये संक्रमण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर कंपन्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हा निर्णय म्हणे आधार, सॉफ्टवेअर अथवा कार्ड प्रिंटसारखा नाही, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.
नीती आयोगाचे ईलेक्ट्रिक वाहनांबाबतचे धोरण हे पुरेसा अभाव आणि परिश्रम घेतल्याशिवाय तयार करण्यात आल्याची टीका बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटार कंपनीने केली आहे.
टीव्हीएस मोटारचे को चेअरमन वेणू श्रीनिवासन यांचा हा आहे आक्षेप-
ईलेक्ट्रिक वाहनांमध्ये संक्रमण करण्यासाठी सध्याच्या चेन पुरवठ्याजागी संपूर्ण चेन पुरवठा साखळी तयार करावी लागणार आहे. अशी वस्तुस्थिती टीव्हीएस मोटारचे को चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक वेणू श्रीनिवासन यांनी सांगितली. पुढे ते म्हणाले, नियोजन करण्यासाठी काही महिने लागणार असल्याचे त्यांना (नीती आयोग) सांगितले आहे. सर्वात अधिक लोकसंख्या आणि दुचाकींची संख्या असलेल्या शहरापासून नियोजन करण्यात येणार आहे.
२० दशलक्ष वाहने, १५ अब्ज डॉलर किमतींच्या दुचाकींची विक्री, १० लाख कर्मचारी हे बदलणे शक्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांचा हा आहे आक्षेप-
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले, १०० टक्के वाहनांचे ईलेक्ट्रिकमध्ये संक्रमण करण्याचा निर्णय पूर्णपणे अनावश्यक आहे. बीएस - ४ च्या नियमाची कंपन्यांकडून अमंलबजावणी होत आहे. अशा वेळी ईलेक्ट्रिक वाहनांचा निर्णय अव्यवहारिक असल्याचे त्यांनी म्हटले.
दुचाकींमुळे केवळ ४ टक्के प्रदूषण-
वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले, की एकूण वाहनांच्या प्रदूषणामध्ये दुचाकींच्या प्रदुषणाचा २० टक्के वाटा आहे. तर एकूण प्रदूषणामध्ये दुचाकींच्या प्रदूषणाचा २० टक्के वाटा आहे. याचा अर्थ दुचाकींमुळे केवळ ४ टक्के प्रदूषण होत असताना ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
वाहन उद्योग हे स्थिर अशा धोरणातून प्रचंड अशा विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करते. त्यामुळे या धोरणाला अत्यंत काळजीने आणि एकाग्रतेने हाताळण्याची गरज आहे. वाहन कंपन्या या तीव्र स्पर्धेला तोंड देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.