ETV Bharat / business

हवाला चॅनेलच्या मदतीने चीनमधून देशात वस्तुंची आयात, सीएआयटीची केंद्राकडे चौकशीची मागणी - C Bhartia

चीनमधून आयात होणारा माल प्रत्यक्षात कमी दाखविला जात असल्याचे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतीय आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.  माल आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काही अधिकारी यात गुंतले असावेत असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 17, 2019, 10:48 PM IST

नवी दिल्ली - चीनमधून देशात हवाला चॅनेलमार्गे वस्तू आयात होत असल्याची तक्रार अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) सरकारकडे केली आहे. हा हवालाचा पैसा दहशतवादासाठी पाकिस्तानला पाठविण्यात येत असल्याचा संशय सीएआयटीने व्यक्त केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी सीएआयटीने केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने लक्ष घातले तर कर लागू करण्यात आल्याने चिनी वस्तुही महाग होतील, असे सीएआयटीने म्हटले आहे.

चीनमधून देशातील बंदरामार्गे आयात होणाऱ्या वस्तुंची चौकशी करावी, असे सीएआयटीने म्हटले आहे. देशाची सुरक्षा आणि हितासाठी हवाला ऑपरेटरची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही सीएआयटीने म्हटले आहे. देश दहशतवादाच्या समस्येला तोंड देत आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांना कोणीतरी आर्थिक मदत करत आहे, यात कोणताही संशय नाही. ही मदत चीनमधून देशात वस्तू आयात करून केली जाते. अशाप्रकारे चीन हा दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.

चीनमधून आयात होणारा माल प्रत्यक्षात कमी दाखविला जात असल्याचे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतीय आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे. माल आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काही अधिकारी यात गुंतले असावेत असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर आयजीएसटी कधीही लावण्यात येत नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आयातदार हा वस्तू काळ्या बाजारात विकत असल्याने असे घडत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने यात दक्षतेने लक्ष घातले तर आयात शुल्क आणि आयजीएसटीचा बुडविण्यात येणारा महसूल मिळू शकेल, असे सीएआयटीने म्हटले आहे.

Intro:Body:

हवाला चॅनेलच्या मदतीने चीनमधून देशात वस्तुंची आयात, सीएआयटीची केंद्राकडे चौकशीची मागणी

नवी दिल्ली - चीनमधून देशात हवाला चॅनेलमार्गे वस्तू आयात होत असल्याची तक्रार अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) सरकारकडे केली आहे. हा हवालाचा पैसा दहशतवादासाठी पाकिस्तानला पाठविण्यात येत असल्याचा संशय सीएआयटीने व्यक्त केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी सीएआयटीने केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने लक्ष घातले तर कर लागू करण्यात आल्याने चिनी वस्तुही महाग होतील, असे सीएआयटीने म्हटले आहे.

चीनमधून देशातील बंदरामार्गे आयात होणाऱ्या वस्तुंची चौकशी करावी, असे सीएआयटीने म्हटले आहे. देशाची सुरक्षा आणि हितासाठी  हवाला ऑपरेटरची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही सीएआयटीने म्हटले आहे.

देश दहशतवादाच्या समस्येला तोंड देत आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांना कोणीतरी आर्थिक मदत करत आहे, यात कोणताही संशय नाही. ही मदत चीनमधून देशात वस्तू आयात करून केली जाते. अशाप्रकारे चीन हा दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.

चीनमधून आयात होणारा माल प्रत्यक्षात कमी दाखविला जात असल्याचे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतीय आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.  माल आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काही अधिकारी यात गुंतले असावेत असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर आयजीएसटी कधीही लावण्यात येत नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आयातदार हा वस्तू काळ्या बाजारात विकत असल्याने असे घडत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने यात दक्षतेने लक्ष घातले तर आयात शुल्क आणि आयजीएसटीचा बुडविण्यात येणारा महसूल मिळू शकेल, असे सीएआयटीने म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.