नवी दिल्ली - देशातील सर्व दुकाने आणि व्यवसाय रविवारी बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) जनता कर्फ्युला पाठिंबा दिला आहे.
सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले, देशात सुमारे ७ कोटी व्यापारी आहेत. त्यापैकी दिल्लीत १५ लाख व्यापारी आणि सुमारे ३५ लाख त्यांचे कर्मचारी आहेत. आम्ही २२ मार्चला जनता कर्फ्युत सहभागी होणार आहोत.
हेही वाचा-उद्योगांना आर्थिक पॅकेज मिळण्याची शक्यता; पंतप्रधानांकडून टास्क फोर्सची घोषणा
रविवारी देशातील ७ कोटी व्यापारी दुकाने बंद करणार आहेत. तर ४० कोटी व्यापाऱ्यांकडे काम करत असलेले कर्मचारी घरी असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. या संचारबंदीला जनता कर्फ्यू असे म्हणत त्यांनी संचारबंदी जनतेसाठी, जनतेने लादलेली आणि जनतेकरिता असल्याचे सांगितले.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजार सावरण्यास सुरुवात: निर्देशांक १,३३७ अंशांनी वधारला