मुंबई – जागतिक अनिश्चितता, गुंतवणुकीकरता आणि पुरवठ्याबाबत चिंता असल्याने सोन्यासह चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर भविष्यातील सौद्यांसाठी प्रति तोळा हा 56 हजार 191 रुपये झाला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमधील सौद्यासाठी सोन्याचा दर प्रति तोळा हा 55 हजार 950 रुपये होता.
कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक मानली जात असल्याने गुंतवणुकदारांमधून सोन्याची मागणी वाढली आहे.
एमसीएक्समध्ये चांदीचे दर हे प्रति किलो हे 77 हजार 949 रुपये झाले आहेत. हे पूर्वीच्या दराहून प्रति किलोला 848 रुपयांनी अधिक आहेत. यापूर्वी सप्टेंबरमधील चांदीसाठी प्रति किलो 76 हजार 900 रुपये दर होता.
बाजार विश्लेषकांच्या मते औद्योगिक आणि गुंतवणूकासाठी सोन्याची मागणी वाढली आहे. टाळेबंदी खुला होत असताना चांदीचे दर हळूहळू वाढत आहेत. कारण जागतिक बाजारपेठेत चांदीचा पुरवठा करणाऱ्या पेरुमधील खाणींमधून टाळेबंदीमुळे कमी उत्पादन झाले आहे. पेरुमधील खाणींमधून चांदीचे उत्पादन हे जगात दुसऱ्या क्रमांकावर घेण्यात येते. पण, टाळेबंदीमुळे या खाणींमधून एक तृतीयांश उत्पादन घटले आहे.