ETV Bharat / business

चिनी कंपन्यांना पुन्हा दणका; बीएसएनएलकडून 4 जीचे कंत्राट रद्द

author img

By

Published : Jul 1, 2020, 8:56 PM IST

दूरसंचार उत्पादनांच्या कंत्राटात चिनी कंपन्यांची उत्पादने वापरू नयेत, असे केंद्रीय दूरसंचार विभागाने बीएसएनएलला सूचना केली होती. सूत्राच्या माहितीनुसार नव्या कंत्राटात देशात निर्मिती झालेल्या दूरसंचार उत्पादनांवर भर दिला जाणार आहे.

संग्रहित - बीएसएनएल
संग्रहित - बीएसएनएल

नवी दिल्ली – अ‌ॅपवरील बंदीनंतर चिनी कंपन्यांना भारताकडून पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. भारत संचार निगम कंपनीने (बीएसएनएल) 4जीचे अद्ययावतीकरणाचे कंत्राट रद्द केले आहे. त्यामुळे नव्या कंत्राटात देशातील उत्पादनांना प्राधान्य देवून चिनी कंपन्यांना कंत्राटातून वगळण्यात येणार आहेत.

दूरसंचार उत्पादनांच्या कंत्राटात चिनी कंपन्यांची उत्पादने वापरू नयेत, असे केंद्रीय दूरसंचार विभागाने बीएसएनएलला सूचना केली होती. सूत्राच्या माहितीनुसार नव्या कंत्राटात देशात निर्मिती झालेल्या दूरसंचार उत्पादनांवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांना कंत्राट मिळू शकणार नाही. याबाबत बीएसएनएलचे चेअरमन यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. देशामध्ये नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळण्याकरता देशातील तंत्रज्ञानालाच कंत्राटातून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. त्यामुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळणार आहे.

दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज घोषित केले होते. त्या पॅेकेजमध्ये बीएसएनएलला 4जी अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.