जबलपूर - भारत-रशियाने संयुक्तपणे स्थापन केलेल्या ब्राह्मोस एअरोस्पेसने कोरोनाच्या संकटात सरकारला मदत केली आहे. ब्राह्मोसने मध्य प्रदेशमधील जबलपूर प्रशासनाला ५०० पीपीई कीट आणि २ हजार ५०० एन-९५ मास्क दिले आहेत.
ब्राह्मोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुमार मिश्रा म्हणाले, जबलपूर प्रशासनाला आणखी मदत करण्यात येणार आहे. रेड क्रॉस सोसायटीचे सचिव आशिष दिक्षीत यांच्याहस्ते ब्रम्होसकडून देण्यात आलेले वैद्यकीय साहित्य जबलपूरचे जिल्हाधिकारी भारत यादव यांना दिले. या मदतीबद्दल जिल्हा प्रशासनाने ब्राह्मोसच्या सीईओंचे आभार मानले आहेत.
हेही वाचा-दिलासादायक तंत्रज्ञान! स्वदेशी पीपीईची हरियाणातील विद्यापीठाकडून निर्मिती