नवी दिल्ली - कामगार संघटनांच्या देशव्यापी संपात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनाही सहभाग झाली आहे. त्यामुळे देशात ठिकठिकाणी बँकिंग सेवा विस्कळीत झाली आहे.
सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी १० केंद्रीय व्यापारी संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारी बँकांमध्ये पैसे जमा करण्याची व बँकांमधून पैसे काढण्याच्या सेवेवर परिणाम झाला आहे. कामगार संघटनांच्या संपाला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बीइएफआय, आयएनबीइएफ, आयएनबीओसी आणि बँक कर्मचारी सेना महासंघ (बीकेएसएम) या संघटना सहभागी झाल्या आहेत.
हेही वाचा-सलग सहा दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीला 'ब्रेक'
बँकांचे विलीनीकरण, खासगीकरण, शुल्कवाढ आणि वेतनवाढीसंदर्भातच्या सरकारकच्या धोरणांना विरोध असल्याचे एआयबीईएचे महासचिव सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले. याशिवाय ऑल इंडिया रिझर्व्ह बँक एम्पलॉईज असोसिएशन (एआयआरबीईए) आणि ऑल इंडिया रिझर्व्ह बँक वर्कर्स फेडरेशन (एआयआरबीडब्ल्यूएफ) आणि काही विमा संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा-सुझलॉन एनर्जीने बँकांचे थकविले ७,२०० कोटी रुपये!
या संघटना संपात आहे सहभागी -
आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सिटू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, सेवा, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूटीस या केंद्रीय व्यापारी संघटना संपात सहभागी होत आहेत. यासह विविध संघटनांही संपात सहभागी झाल्या आहेत.