ETV Bharat / business

कोरोनाचा फटका; कंपन्यांतील वेतनवाढीचे प्रमाण गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी

खासगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत डेलाईट टच टोहमात्सू इंडिया एलएलपीने सर्वेक्षण केले आहे. वेळ आणि कोरोना महामारी हे महत्त्वाचे मुद्दे हे चालू आर्थिक वर्षात वेतनवाढीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.

author img

By

Published : Aug 24, 2020, 6:25 PM IST

प्रतिकात्मक-वेतनवाढ
प्रतिकात्मक-वेतनवाढ

नवी दिल्ली – कंपन्यांकडून चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना सरासरी वेतनवाढ 3.6 टक्के देण्यात आली आहे. तर मागील आर्थिक वर्षात कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 3.6 टक्के वेतनवाढ देण्यात आली होती, असे एका सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. ही वेतनवाढ गेल्या दहा वर्षात सर्वात कमी असल्याचे डेलाईट कंपनीने म्हटले आहे.

खासगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत डेलाईट टच टोहमात्सू इंडिया एलएलपीने सर्वेक्षण केले आहे. वेळ आणि कोरोना महामारी हे महत्त्वाचे मुद्दे हे चालू आर्थिक वर्षात वेतनवाढीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.

  • सर्वेक्षणामधील 10 पैकी 4 कंपन्यांनी चालू वर्षात कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्याचे म्हटले आहे.
  • तर 33 टक्के कंपन्यांनी कोणतीही वेतनवाढ देणार नसल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित कंपन्यांनी वेतनवाढीबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.
  • चालू आर्थिक वेतनवाढ दिलेल्या कंपन्यांचा विचार करता चालू वर्षात सरासरी 7.5 टक्के वेतनवाढ झाली आहे.
  • लाईफ सायन्सेसमध्ये सर्वाधिक वेतनवाढ झाली आहे. तर उत्पादन आणि सेवा क्षेत्रात सर्वात कमी वेतनवाढ झाली आहे. डिजीटल, ई-कॉमर्स कंपन्यांकडून दोन अंकी वेतनवाढ देण्यात येते. मात्र, या कंपन्याही वेतनवाढ देण्यासाठी अडचणींचा सामना करत आहेत.
  • दुसरीकडे मनुष्यबळच्या टीमकडून कंपन्यांच्या खर्चात कपात होण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये पदोन्नतीत कपात करणे, वेतनवाढीचा पुनर्रचना करणे अशा उपाययोजना करण्यात येतात, असे सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.

कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम-

कोरोना महामारीमुळे देशात 25 मार्चला टाळेबंदी लागू करण्यात आली होती. केंद्र सरकारने मे महिन्याच्या शेवटी टाळेबंदीचे नियम शिथील केले होते. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही राज्यांमध्ये टाळेबंदीचे नियम कायम राहिले आहेत. कोरोना आणि अंशत: असलेल्या टाळेबंदीमुळे देशातील आर्थिक चलवलन विस्कळित झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.