ETV Bharat / business

फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट; अॅपलने २० स्टोअर केले बंद - फ्रान्स कोरोना लॉकडाऊन

जगभरात अॅपलचे स्टोअर पूर्वीप्रमाणे सुरू होत असताना फ्रान्समधील स्थिती वेगळी आहे. अॅपलने फ्रान्समधील २० स्टोअर बंद केली आहेत.

अॅपल
Apple
author img

By

Published : Apr 3, 2021, 9:20 PM IST

पॅरिस - फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असताना टाळेबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशातच अॅपलने फ्रान्समधील स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात अॅपलचे स्टोअर पूर्वीप्रमाणे सुरू होत असताना फ्रान्समधील स्थिती वेगळी आहे. अॅपलने फ्रान्समधील २० स्टोअर बंद केली आहेत. अॅपल ओपेरा पॅरिसच्या साईटवर कंपनीने तात्पुरत्या काळासाठी स्टोअर बंद केल्याचे म्हटले आहे. सध्या केवळ ऑनलाईन ऑर्डर स्वीकारत आहोत. मदतीसाठी ३ एप्रिलपर्यंत अपॉईंटमेंटचे नियोजन करण्यात आल्याची कंपनीने माहिती दिली आहे. मॅगजेनरेशनच्या माहितीनुसार स्टोअर हे पुढील नोटीसपर्यंत बंद राहणार आहेत.

हेही वाचा-आईस्क्रीमची वाढली मागणी ; किमतीत बदल होणार नसल्याचे अमुलचे संकेत

फ्रान्समध्ये तीन आठवड्यांसाठी टाळेबंदी-

टाळेबंदीमुळे फ्रान्समध्ये किमान तीन आठवडे शाळा बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये टाळेबंदीचे काही नियम लागू करण्यात आले होते. मात्र, ३ एप्रिलपासून बिगर जीवनावश्यक स्टोअर हे बंद राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इममॅन्यूएल मॅक्रॉन यांनी बुधवारी रात्री तीन आठवड्याची टाळेबंदी लागू करत असल्याची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू केले आहेत.

हेही वाचा-बजाज इलेक्ट्रिकल्सच्या उत्तर प्रदेशमधील कारखान्यात कर्मचारी कपात

भारतात अॅपलच्या विक्रीत वाढ

अ‌ॅपलचा महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प असलेल्या आयफोन १२ स्मार्टफोनचे भारतात उत्पादन होणार आहे. देशात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत सणादरम्यान आयफोनला ग्राहकांनी चांगली पसंती दर्शविल्याचे सायबरमीडिया रिसर्चने (सीएमआर) म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.