सॅनफ्रान्सिस्को – अॅपलने चीनमधील अॅप स्टोअरमधून 47 हजार अॅप हटविले आहेत. चीन सरकारच्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अॅपल स्टोअरमध्ये असलेल्या त्रुटी बंद करण्याचा चीन प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून अॅपलकडून सरकारच्या नियमाप्रमाणे अॅप स्टोअरमधून अॅप हटविण्यात आले आहेत. चीन सरकार आणि स्थानिक भागीदारांचा परवाना नसतानाही अॅपलचे स्टोअर आणि इतर सेवा चीनमध्ये देत आहे.
चीन व अमेरिकेत तणावाची स्थिती-
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वूईचॅट बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी दूरसंचार क्षेत्रातील चीनची बलाढ्य कंपनी हुवाईवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अमेरिका व चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत चीनही तंत्रज्ञान कंपन्यांसाठी कठोर नियम करत आहे.
गेल्या महिन्यात अॅपलने चीनमधील अॅप स्टोअरमधून 4,500 गेम काढून टाकले होते. चीनच्या इंटरनेट धोरणांचे नियम पालन करण्यासाठी कंपनीवर दबाव होता. चीनच्या नव्या नियमाप्रमाणे गेम डेव्हलपरला चीनच्या नियामक संस्थेची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ते गेम चीनमधील अपलच्या अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध करता येणार आहेत. अॅपलचे चीनमधील अॅप स्टोअरमधून 16.4 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला होता. दर अमेरिकेत अॅप स्टोअरमधून कंपनीने 15.4 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला होता. सध्या अॅपलच्या चीनमधील स्टोअरमध्ये शुल्क असलेले 60 हजार गेम आहेत.