नवी दिल्ली - विमान कंपनीने 'भारत बंद'दरम्यान दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी विमान प्रवासाच्या वेळेत बदल व तिकीट रद्द केले तरी त्यांना शुल्क लागू करण्यात येणार नाही. भारत बंदमुळे अनेकांना अडचणी येऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
भारत बंदमुळे प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकणार आहेत. त्यामुळे त्यांनी आज विमान तिकीट रद्द केले अथवा वेळेत बदल केला तर त्यांच्यावर शुल्क लागू होणार नाही. मात्र, प्रकरणनिहाय तिकिटांनाच अशी मुभा देणार असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-आरोग्याचे उद्दिष्ट सांगितल्यास मिळणार भत्ता! कोटकची कर्मचाऱ्यांना ऑफर
भारत बंदचा बहुतेक देशातील विमानतळाच्या कामकाजावर परिणाम झाला नाही. दिल्लीतील विमानतळावर नेहमीप्रमाणे विमान उड्डाणे सुरू होती. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत २६ नोव्हेंबरपासून नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आज देशभरात भारत बंदचे आवाहन केले आहे. तसेच सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रास्तारोकोचे आवाहन केले आहे.