मुंबई - कमी दरात विमान सेवा देणाऱ्या एअरएशिया इंडियाने २१ शहरांसाठी विमान तिकिट बुकिंग आजपासून सुरू केले आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची आणि प्रक्रियेची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एअरएशिया इंडियाने म्हटले आहे.
देशातील विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सरकार नव्या आचारसंहितेसाठी कंपन्यांबरोबर काम करत आहे. विमान प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत असल्याचे एअरएशियाने म्हटले आहे.
हेही वाचा- जाणून घ्या, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
विमान प्रवासाकरिता सरकारने जारी केलेल्या नव्या प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचनांनी विमान प्रवाशांचा आत्मविश्वास वाढेल, असे एअरएशियाचे सीईओ सुनील भास्करन यांनी सांगितले. विमान प्रवाशांना विमानतळात येण्यापूर्वी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. विमान उ़ड्डाण होण्यापूर्वी प्रवाशांना विमातळावर दोन ते तीन तासापूर्वी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
हेही वाचा-किरकोळ व्यापार क्षेत्राला दोन महिन्यात ९ लाख कोटींचा फटका
दरम्यान, देशात टाळेबंदीमुळे २५ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंद होती. त्यामागे कोरोनाचा संसर्ग देशात अधिक पसरू, हा उद्देश होता.