मुंबई - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी अॅमेझॉनबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्यानंतर कंपनीने मोठी घोषणा केली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी भारतात २०२५ पर्यंत १० लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले.
अॅमेझॉनने २०१३ पासून ७ लाख रोजगार निर्मिती केल्याचे म्हटले आहे. येत्या पाच वर्षात लाखो रोजगार निर्मिती करणार असल्याचेही अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. त्यासाठी तंत्रज्ञान, पायाभूत आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जेफ यांनी म्हटले आहे. भागीदारी केलेल्या लघू उद्योगांकडून आणि आमच्या कर्मचाऱ्यांकडून असमान्य निर्मिती क्षमतचे योगदान पाहिले आहे. जे कर्मचारी आमच्याबरोबर खरेदी करतात त्यांच्यासाठी खूप उत्साही आहोत. जे काही पुढे आहे, त्याबाबत उत्साह असल्याचे अॅमेझॉनचे संस्थापकाने म्हटले आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही कपात; जाणून घ्या, आजचे दर
भारत दौऱ्यावर भेटीला आलेल्या जेफ बेझोस यांना पंतप्रधान नरेंद्र हे भेटले नाहीत. जेफे बेझोस हे ११७ दशलक्ष डॉलर संपत्ती असलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
संबंधित बातमी वाचा-अॅमेझॉनकडून अब्ज डॉलरची गुंतवणूक, पियूष गोयल यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
काय म्हणाले होते पियूष गोयल-
अॅमेझॉन गुंतवणूक करून देशावर मेहेरेनजर दाखवत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी आहे. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस यांनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतणूक करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले होते.
हेही वाचा-इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मागितले उत्तर