नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पहिल्या अधिवेशनाचे पहिले सत्र आज संपले आहे. लोकसभेचे कामकाज हे ८ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम रद्द झाल्यानंतर घेतलेल्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा सायंकाळी ४ वाजता तहकूब केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार हे भांडवलधार्जीणे असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर आज लोकसभेत जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा-भारतमाला परियोजनेच्या निधीत होणार ६० टक्के वाढ
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा ८ मार्चला सुरू होणार आहे. तर अधिवेशन हे ८ एप्रिलला संपणार आहे. राज्य सभेतील पहिले सत्र शुक्रवारी संपले आहे. कोरोना महामारीमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात ३७,२०० नवीन एमएसएमई उद्योगांची नोंदणी