मुंबई - सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच एक्झिट पोलचे अंदाजही वर्तवण्यात येत आहेत. यावरूनच विवेकने ऐश्वर्यासोबतचा असलेला एक मीम सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरुन बराच वाद तयार झाला आहे. महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवण्यापर्यंत हा वाद पुढे गेलाय. यानंतर विवेकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनेकांनी त्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. यावर विवेक म्हणतो, "लोक मला माफी मागण्याचा सल्ला दते आहेत., मला माफी मागण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला सांगा मी काय चुकीचे केले ? जर मी काही चुकीचे केले असेल तर मी माफी मागेन. मी काही चुकीचे केलेय असे मला वाटत नाही. काय चुकीचे आहे त्यात ? कोणीतरी मिम बनवले आणि मी त्यावर हसलो, बस इतकेच."
तो पुढे म्हणाला, "लोक या गोष्टीचा का इतका मोठा इश्यू करीत आहेत, हे मला कळत नाही. कोणीतरी मला फनी मिम पाठवले. मी त्याच्यावर हसलो, त्या व्यक्तीच्या क्रिएटीव्हीटीला मी दाद दिली. कोणीतरी तुमची मस्करी करीत असेल तर त्याला गंभीरपणे घेतले जाऊ नये."
"ज्या मिममध्ये लोक आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण इतरांना आहे. काम करायला गेल्यानंतर नॉन इश्यूवर नेतागिरी सुरू होते. तिकडे दीदीने एकाला मिमच्या कारणास्तव जेलमध्ये टाकले. ते माझा चित्रपट थांबवू शकले नाहीत, ते आता असले उद्योग करीत आहेत."
राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र महिला आयोगाने नोटीस दिली असल्याबद्दल बोलताना विवेक म्हणाला, "मी त्यांना भेटणार आहे. कारण मी काहीही केलेले नाही हे मला त्यांना सांगायचे आहे."
विवेकने हे मिम शेअर केल्यानंतर सोनम कपूरने त्याला प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर देताना विवेक म्हणतो , "तू तुझ्या सिनेमात ओव्हर अॅक्ट करणे बंद कर आणि सोशल मीडियात थोडे कमी ओव्हर रियॅक्ट कर. मी महिला सक्षमी करणासाठी गेली १० वर्षे काम करीत आहे. मला वाटत नाही मी कोणाला दुखवलंय."