मुंबई - भारतीय संघ २००४ साली पाच एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. यात भारताने एकदिवसीय मालिकेत ३-२ तर कसोटीत २-१ असा विजय मिळवला. यातील २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला. यातील दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सेहवाग त्रिशतक ठोकत मुल्तानचा सुलतान झाला होता.
🗓️ 29 Mar 2004
— ICC (@ICC) March 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🏟️ Multan Cricket Stadium
💯💯💯#OnThisDay, @virendersehwag became the first Indian batsman to score a triple-hundred, getting to the mark with a six off Saqlain Mushtaq in the Test against Pakistan.
Which of Sehwag's two triples is your favourite? pic.twitter.com/ieSf2NUMbx
">🗓️ 29 Mar 2004
— ICC (@ICC) March 29, 2019
🏟️ Multan Cricket Stadium
💯💯💯#OnThisDay, @virendersehwag became the first Indian batsman to score a triple-hundred, getting to the mark with a six off Saqlain Mushtaq in the Test against Pakistan.
Which of Sehwag's two triples is your favourite? pic.twitter.com/ieSf2NUMbx🗓️ 29 Mar 2004
— ICC (@ICC) March 29, 2019
🏟️ Multan Cricket Stadium
💯💯💯#OnThisDay, @virendersehwag became the first Indian batsman to score a triple-hundred, getting to the mark with a six off Saqlain Mushtaq in the Test against Pakistan.
Which of Sehwag's two triples is your favourite? pic.twitter.com/ieSf2NUMbx
या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी राहुल द्रविड नेतृत्व करत होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी भारताने २ बाद ३५० धावा केल्या होत्या. त्यात सेहवागने २२८ धावा कुटल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने त्रिशतक ठोकत पराक्रम केला. या त्रिशतकासह सेहवागने व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता येथे काढलेला २८१ धावांचा विक्रम मोडीत काढला.
सेहवागने ३७५ चेंडूत ३०९ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्यात खणखणीत ३९ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडला. वीरुसोबत सचिननेही १९४ धावांची नाबाद खेळी केली होती. सचिनला द्विशतक करु न दिल्याने राहुल द्रविडवर टीका करण्यात आली होती. सिक्सर किंग युवराज सिंगने दमदार अर्धशतकी खेळी साकारली. यासोबत भारताने पहिल्या डावात ५ बाद ६५७ धावाचा डोंगर रचला होता.
या सामन्यात अनिल कुंबळे आणि इरफान पठाणने भेदक मारा केला. पाकिस्तानला पहिल्या डावात ४०७ तर दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळताना २१६ धावा करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि ५२ धावांनी जिंकला होता.