बंगळुरू - भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय तर सातवा फलंदाज ठरला आहे. कोलकाताविरुद्ध खेळताना १७ धावा काढताच त्याने हा पल्ला गाठला. यापूर्वी रैनाने ८ हजार ११० धावा केल्या आहे.
विराट कोहलीने २००७ साली टी-२० क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्याने २५७ सामन्यात २४३ डाव खेळूने ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो ख्रिस गेलनंतर सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. विराट सध्या रॉयल बंगळुरू चॅलेजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. गौतम गंभीर ४२४२ तर महेंद्र सिंह धोनी ५३७५ धावा केल्या आहेत.
विराट पूर्वी ८ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडूंमध्ये ख्रिस गेल (१२४५७), ब्रॅडन मॅक्यलम (९९२२), किरोन पोलार्ड (९०८७), शोएब मलिक (८७०१), डेव्हिड वॉर्नर (८३७५) यांचा समावेश आहे.