मुंबई- लॉकडाऊनदरम्यान वाढलेले वीजबिल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत लोकांच्या मनतील प्रश्नांची उत्तरे दिली. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले. थकीत वीजबिल 3 महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.
विजेच्या बिलासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम आहेत. वीज नियामक आयोगाने सूचना दिल्या आहेत. एमईआरसीने दारोदारी जाऊन रीडिंग घेतलेले नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे सरासरीपेक्षा कमी मीटर घेऊन एप्रिल, मे महिन्यात बिल आकारण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल व मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असे नितीन राऊत यांनी म्हटले. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालयात मदत केंद्रात नेमलेले आहेत. त्यानुसार ग्राहकांना समजावण्याचे काम सुरू आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समधील प्रमुख मुद्दे:
- ग्राहकांना बिल वितरण करू नये, मीटर रीडिंग करू नये असे शासनाचे महावितरणला आदेश.
- 1 जून 2020 प्रतिबंधित क्षेत्र वगळून वीज बिल संकलन सुरू केले. लॉकडाऊन काळात येणारी बिले सरासरी करून दिली आहे, त्यामुळे बिलाची रक्कम वाढलेली दिसते.
-लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉमहोममुळे सुद्धा काही प्रमाणात वीजबिलात वाढ झाली आहे.
- मीटर रीडर व बिल वाटप करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांना सम्पर्क करण्याविषयीची ट्रेनिंग दिली आहे. तसेच हेल्पलाईन ग्राहक सेवा फोन लाईन सुरू करण्यात आली आहे.
-पूर्ण बिलाच्या एक तृतियांश बिलाची रक्कम भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार नाही.
- वीज ग्राहकाचे समाधान करणे आमचे काम.
- जनतेची आर्थिक अडचण लक्षात घेता महाविकास आघाडी सरकार जनतेच्या मदतीसाठी कटिबद्ध आहे.
- केंद्र सरकार सावकारासारखे वागत आहे.
- सरकारचा पूर्ण प्रयत्न संवाद साधायचा आणि समस्या सोडवायचा आहे, मोठ्या वीज कंपनींना ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश.
-ग्राहकांचे समाधान न झाल्यास तक्रार करावे.