ETV Bharat / briefs

जिल्ह्यात 11, 306 पैकी आतापर्यंत 7883 कोरोना मुक्त; आज 188 बाधित तर तीन जणांचा मृत्यू - चंद्रपूर कोरोना अपडेट

 Today 188 infected and 3 patients died in chandrapur, till now 7883 patient were free from corona out of 11,306

author img

By

Published : Oct 6, 2020, 10:01 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188 बधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 11 हजार 306 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 883 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 246 आहे. तर, आज तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये खुटाळा येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या रुग्णाला 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू घुटकाळा परिसरातील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या रुग्णाला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तर, तिसरा मृत्यू लक्ष्मी नगर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय पुरुषाचा झाला आहे. या रुग्णांवर 1 ऑक्टोबर पासून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार होता.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना 177 ग्रस्तांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये जिल्ह्यातील 168, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात 24 तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 76, पोंभूर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 17, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील आठ, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 11, नागभीड तालुक्यातील 26, वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 9, सावली तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील आठ, गडचिरोली, गोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आज 'या' ठिकाणी आढळले बाधित -

चंद्रपूर शहरातील व परिसरातील जलनगर वार्ड, ऊर्जानगर, बागला चौक परिसर, सिस्टर कॉलनी परिसर, रामनगर, मित्र नगर, बाबुपेठ, विठ्ठल मंदिर वार्ड, वाघोबा चौक तुकूम, दुर्गापुर , सिद्धार्थ नगर भागात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तालुकानिहाय आढळलेले रुग्ण -

बल्लारपूर तालुक्यातील आंबेडकर वार्ड, फुलसिंग नाईक झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, टिळक वार्ड, बालाजी वार्ड, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती, जवाहर नगर, सोनिया गांधी चौक परिसर, रामनगर कॉलनी परिसर या परिसरात आज कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

वरोरा तालुक्यातील माढेळी, मालवीय वार्ड, आंबेडकर चौक परिसर, कॉलरी वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गाडगेबाबा नगर, विद्यानगर, कुर्झा, चिखलगाव, बाजार चौक परिसर, आक्सापुर, शारदा कॉलनी परिसरातही आज पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, गुरूनगर, कुणबी सोसायटी परिसरातून बाधित पुढे आले आहे.सावली तालुक्यातील अंतरगाव या भागात रुग्ण आढळले.

नागभीड तालुक्यातील नवखेडा, वाढोणा, शिंदे लेआउट परिसर, गिरगाव, डोंगरगाव, सावरगाव, नवखडा, किरमिटी मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील बंदर खडसंगी,भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर, लाल बहादुर स्कूल परिसर, कन्हाळगाव भागातही रुग्णांची नोंद करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.