लखनौ - बसप अध्यक्ष मायावती केस काळे करून स्वतःला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात, असे आक्षेपार्ह विधान भाजपचे आमदार सुरेद्र नारायण सिंह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाने राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.
मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी यांच्या राहणीमाणावर टीका केली होती. नरेंद्र मोदी हे साधे जीवन आणि उच्च विचारांच्या विरोधाभासी म्हणजेच शाही अंदाजात जगतात. मागच्या निवडणुकांमध्ये मतदान मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःला 'चायवाला' म्हणून प्रचारीत केले होते. त्यानंतर यावेळी मोठी तयारी आणि शान सहीत स्वतःला चौकीदार म्हणून घोषित केले आहे. देश खरच बदलत आहे का? असा तो मायावतींचा ट्विट होता.
सादा जीवन उच्च विचार के विपरीत शाही अन्दाज में जीने वाले जिस व्यक्ति ने पिछले लोकसभा आमचुनाव के समय वोट की खातिर अपने आपको चायवाला प्रचारित किया था, वे अब इस चुनाव में वोट के लिये ही बड़े तामझाम व शान के साथ अपने आपको चोकीदार chowkidar घोषित कर रहेे हैं। देश वाकई बदल रहा है?
— Mayawati (@Mayawati) March 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सादा जीवन उच्च विचार के विपरीत शाही अन्दाज में जीने वाले जिस व्यक्ति ने पिछले लोकसभा आमचुनाव के समय वोट की खातिर अपने आपको चायवाला प्रचारित किया था, वे अब इस चुनाव में वोट के लिये ही बड़े तामझाम व शान के साथ अपने आपको चोकीदार chowkidar घोषित कर रहेे हैं। देश वाकई बदल रहा है?
— Mayawati (@Mayawati) March 19, 2019सादा जीवन उच्च विचार के विपरीत शाही अन्दाज में जीने वाले जिस व्यक्ति ने पिछले लोकसभा आमचुनाव के समय वोट की खातिर अपने आपको चायवाला प्रचारित किया था, वे अब इस चुनाव में वोट के लिये ही बड़े तामझाम व शान के साथ अपने आपको चोकीदार chowkidar घोषित कर रहेे हैं। देश वाकई बदल रहा है?
— Mayawati (@Mayawati) March 19, 2019
या ट्विटवरून सुरेंद्र नारायण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मायावतींवर अगदी खालच्या शब्दात त्यांनी वक्तव्य केले. मायावतींचे केस पांढरे झाले आहेत. तरी त्या केसांना काळा रंग देऊन स्वतःला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात. केस पांढरे असताना स्वतःला तरुण दाखवणे याला बनावटी 'शौक' म्हणतात, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर मायावती रोज चेहऱ्याची फेशीअल करतात, असेही सुरेंद्र नारायण म्हणाले.
#WATCH BJP MLA Surendra Narayan Singh: Mayawati ji khud roz facial karwati hain, vo kya humare neta ko kya shaukeen kahengi. Baal paka hua hai aur rangeen karwake ke aaj bhi apne aap ko Mayawati ji jawan saabit karti hain, 60 varsh umar ho gayi lekin sab baal kaale hain pic.twitter.com/SGRK4gZpEI
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH BJP MLA Surendra Narayan Singh: Mayawati ji khud roz facial karwati hain, vo kya humare neta ko kya shaukeen kahengi. Baal paka hua hai aur rangeen karwake ke aaj bhi apne aap ko Mayawati ji jawan saabit karti hain, 60 varsh umar ho gayi lekin sab baal kaale hain pic.twitter.com/SGRK4gZpEI
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019#WATCH BJP MLA Surendra Narayan Singh: Mayawati ji khud roz facial karwati hain, vo kya humare neta ko kya shaukeen kahengi. Baal paka hua hai aur rangeen karwake ke aaj bhi apne aap ko Mayawati ji jawan saabit karti hain, 60 varsh umar ho gayi lekin sab baal kaale hain pic.twitter.com/SGRK4gZpEI
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019
कोण आहेत सुरेंद्र नारायण -
सुरेंद्र नारायण हे उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. नेहमी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यावरुन ते चर्चेत असतात. मागच्या वर्षी त्यांनी भगवान रामही धर्तीवर आले तरी बलात्काराच्या घटना थांबवू शकरणार नाही, असे वक्तव्य केले होते.