मोहाली- आयपीएलच्या २८ व्या सामन्यात बंगळुरूने पंजाबचा ८ गडी राखून पराभव करत आयपीएलमधील पहिला विजय मिळविला. ख्रिस गेल्या नाबाद ९९ धावाच्या जोरावर पंजाबने बंगळुरूपुढे १७४ धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने २० षटकात ४ बाद १७३ धावा केल्या आहेत. बंगळुरूने हे आव्हान१९.२ षटकात २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हे आव्हान सहज पार केले. विराटने ५३ चेंडूत ६७ तर एबीने ३८ चेंडूत ५९ धावा केल्या. मार्कस स्टोईनिस याने आक्रमक २८ धावांची खेळी करत संघाच्या विजयात वाटा उचलला. पंजाबकडून मोहम्मद शमी, आर. अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इतर कोणत्याही गोलंदाजस छाप सोडता आली नाही.
नाणेफेक जिंकून बंगळूरुने पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी ६६ धावांची सलामी दिली. राहुल १८ धावांवर परतला. मात्र ख्रिस गेलने त्यांचा झंझावत कायम ठेवला. त्याने ६४ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या. ज्यात १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
मंयक अगरवाल १५, सर्फराज खान १५ आणि मनदीप सिंह याला १८ धावा करता आल्या.पंजाबकडून युझवेंद्र चहल ३३ धावा देत २ गडी बाद केले. तर मोईन अली आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आला.