मुंबई - महाविकास आघाडी सरकारने भाजपला दणका देत त्यांच्या सरकारच्या काळातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रद्द केल्या आहेत. यामध्ये भाजपच्या कार्यकाळात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि इतर 10 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले आहे.
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदावर निवड केली होती. मात्र निवडणुकीनंतर राज्यात भाजपाबरोबरची युती तोडून शिवसेनेने दोन्ही काँग्रेस समवेत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीकडून भाजपाने विविध महामंडळावर केलेल्या नियुक्ती रद्द करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महामंडळातील नियम 85, (1) आणि नियम 66 (1) च्या तरतूदीला अधिन राहुन उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि अन्य 10 सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. चित्रा वाघ यानी ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द -
दर्शना महाडिक - रत्नागिरी
विना तेलंग - नागपूर
शलाका साळवी, रितू तावडे - मुंबई
चंद्रकांता सोनकाबळे - पिपंरी
मीनाक्षी पाटील - लातूर
साधना सुरडकर, उमा राम शेट्टी - परळी
शैलाजा गरजे - आष्टी
अर्चना डेहनकर - नागपूर