सातारा- कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी होत आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 16 हजार 96 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 167 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 41.96 टीएमसी इतका झाला आहे.
कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी बहुतांशी ठिकाणी व पाटण तालुक्यातही पावसाने उघडीप दिली आहे. धरणांतर्गत विभागात अगोदर पडलेल्या पावसामुळे छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 16 हजार 96 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी होत गेल्याने आवकही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात 2 हजार 167 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 42.11 पैकी उपयुक्त साठा 36.96 टीएमसी, पाणी उंची 2 हजार 97.2 फूट, जलपातळी 639.21 मिटर इतकी झाली आहे.
24 तासातील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे
कोयना 15 मिलीमीटर (1354), नवजा 33 मिलीमीटर (1396) तर महाबळेश्वर येथे 32 मिलीमीटर (1359) पावसाची नोंद झाली आहे.