बारामती- ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या बारामती शहरातील पाच लॉटरी सेंटरवर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकून ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहरातील ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुषार माणिक लोंढे,संकेत पुरुषोत्तम दीक्षित,सुनील अण्णा लष्कर, हेमंत देशमुख,मनोज बबन सोनवले सतीश विठ्ठल सूर्यवंशी,गोपाल राधाकिशन शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत
ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली शहरात बेकायदेशीरपणे जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील नीरज ऑनलाईन लॉटरी सेंटर, श्रीराम गल्ली बारामती, दीक्षित ऑनलाईन लॉटरी सेंटर, श्रीराम गल्ली बारामती, स्वामी समर्थ स्कील गेम लॉटरी सेंटर ,भाजी मंडई बारामती, स्कील गेम २०२० लॉटरी सेंटर, भाजी मंडई बारामती, राजश्री लॉटरी सेंटर खंडोबा नगर या ठिकाणी छापे टाकले. यावेळी काही जण विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत लॉटरी सेंटरमधील संगणक संच, प्रिंटर, वायफाय राऊटर, कागदी चिठ्या, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६३ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात केला. तसेच, जुगार चालकांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.