पॅरिस - बहारीन देशाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी जी ७ परिषदेसाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. फ्रान्समधील बैरिट्झ येथे जी ७ ( ग्रुप ७) समूह देशांची बैठक होणार आहे. २५ आणि २६ ऑगस्ट या दोन दिवशी जी ७ देशांची बैठक चालणार आहे.
-
Bahrain: Prime Minister Narendra Modi leaves for France, to attend the G-7 summit in Biarritz. pic.twitter.com/M8vI3DmWYY
— ANI (@ANI) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bahrain: Prime Minister Narendra Modi leaves for France, to attend the G-7 summit in Biarritz. pic.twitter.com/M8vI3DmWYY
— ANI (@ANI) August 25, 2019Bahrain: Prime Minister Narendra Modi leaves for France, to attend the G-7 summit in Biarritz. pic.twitter.com/M8vI3DmWYY
— ANI (@ANI) August 25, 2019
जगातील अतिप्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांची जी ७ ही संघटना आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, इटली, जर्मनी, ब्रिटन आणि जपान या देशांचा समावेश आहे. या ७ राष्ट्रांकडे ५८ टक्के जागतिक पत आहे. तसेच या ७ देशांचे जागतिक पातळीवर राष्ट्रीय उत्पादन ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
फ्रान्स येथील बैरिट्झ येथे जी ७ बैठक होणार आहे. पर्यावरण, हवामान, तंत्रज्ञान या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.