ETV Bharat / briefs

नांदेडमध्ये मंगळवारी फक्त एक कोरोना पॉझिटिव्ह, तर तीन बाधितांना डिस्चार्ज - nanded latest corona update

मंगळवारी (दि.9 जुन) प्राप्त झालेल्या एकुण 30 अहवालांपैकी 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 193 एवढी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या 3 बाधितांपैकी 65 वर्षे वयाची 1 स्त्री, अनुक्रमे 65 व 74 वर्षे वयाच्या दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 झाली आहे.

nanded news
nanded news
author img

By

Published : Jun 9, 2020, 8:51 PM IST

नांदेड - दिवसभरात नांदेडमध्ये फक्त एका नव्या कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झाली आहे. शाहूनगर परिसरातील 41 वर्षे वयाच्या एका पुरुष बाधिताचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित व्यक्ती आणि पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 1 बाधित अशा एकूण तीन रूग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 193 कोरोनाबाधितांपैकी 134 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 50 रूग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी (दि.9 जुन) प्राप्त झालेल्या एकुण 30 अहवालांपैकी 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 193 एवढी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या 3 बाधितांपैकी 65 वर्षे वयाची 1 स्त्री, अनुक्रमे 65 व 74 वर्षे वयाच्या दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 11 बाधित रूग्णांवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे एका रूग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. मंगळवारी 79 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल बुधवारी सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे

सर्वेक्षण - 1 लाख 43 हजार 723

घेतलेले स्वॅब 4 हजार 579

निगेटिव्ह अहवाल- 4 हजार 43

मंगळवार (9 जून) पॉझिटिव्ह अहवाल संख्या -1,

एकुण पॉझिटिव्ह रूग्ण - 193,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 176,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या -81,

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या- 9,

रुग्णालयातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या- 134,

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या- 50,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.

दरम्जयान, नागरिकांनी घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सतत हात धुणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.