ETV Bharat / briefs

कोरोना इफेक्ट : साताऱ्यात लग्न व इतर कार्यक्रमात आता 50 ऐवजी फक्त 20 जणांचीच लागणार हजेरी - Lockdown satara

जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या 1 हजार 500च्या जवळ गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया व अन्य कार्यक्रमास 50 ऐवजी आता केवळ 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Marriage ceremony attendance satara
Marriage ceremony attendance satara
author img

By

Published : Jul 9, 2020, 4:08 PM IST

सातारा - लग्न कार्यक्रमांसाठी काल पासून केवळ 20 व्यक्तींनाच सोशल डिस्टन्सिंग पाळून सहभागी होता येईल. सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर जाण्यास मनाई असेल. प्रवाशांना कोणत्याही बसने कोणत्याही जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येता येणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल पासून लागू केला आहे. तसेच, जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही अधिकाऱ्याने प्रवेश पास देऊ नका आशा सूचनाही दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या 1 हजार 500 च्या जवळ गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया व अन्य कार्यक्रमास 50 ऐवजी आता केवळ 20 व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लग्नविधीसाठी जिल्ह्याबाहेरील वधू-वर वगळून इतर व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रात लग्नासह अन्य इतर कोणतेही कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई असेल. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर जाता येणार नाही. त्यातून वैद्यकीय सेवेशी निगडित व्यक्ती, रुग्ण व शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.