ETV Bharat / briefs

यवतमाळमध्ये 16 कोरोनाबाधित झाले बरे; एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर एक नव्याने पॉझिटिव्ह

गेल्या 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एक जण पॉझिटिव्ह तर 114 जण निगेटिव्ह आले आहेत. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 68 जण भरती आहेत.

Corona update yavatmal
Corona update yavatmal
author img

By

Published : Jun 28, 2020, 10:27 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 16 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज मृत्यू झालेला व्यक्ती (वय 75) हा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 9 झाली आहे. तसेच आज यवतमाळ तालुक्यातील लाडखेड येथील एक पुरुष नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. काल जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता, एक मृत्यू व एक नव्याने पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या 67 वर स्थिरावली. मात्र आज 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर आली आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एक जण पॉझिटिव्ह तर 114 जण निगेटिव्ह आले आहेत. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 68 जण भरती आहेत.

जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 267 झाली आहे. यापैकी तब्बल 207 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली, तर जिल्ह्यात 9 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 97 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4 हजार 666 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 4 हजार 507 नामुन्यांचे अहवाल प्राप्त, तर 159 अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 240 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.