ETV Bharat / briefs

कोल्हापुरात कोरोनाचा बारावा बळी, तर आज 9 नवे रुग्ण

मृत रुग्ण इचलकरंजी शहरातील असून आजपर्यंत इचलकरंजी येथील हा तिसरा कोरोनाचा बळी ठरला आहे. दरम्यान, कोल्हापुरात गेल्या 5-6 दिवसांपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 1, 2020, 6:45 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात आज आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 12 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आज बळी गेलेला 55 वर्षीय रुग्ण 24 जून रोजी रुग्णालयातून नजर चुकवून रुग्णालयाबाहेरील रिक्षामध्ये बसून पळून गेला होता. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्याला तत्काळ पकडून पुन्हा सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृत रुग्ण इचलकरंजी शहरातील असून आजपर्यंत इचलकरंजी येथील हा तिसरा कोरोनाचा बळी ठरला आहे. दरम्यान, कोल्हापुरात गेल्या 5-6 दिवसांपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सुद्धा आणखी 9 रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 850 वर पोहोचली आहे, तर त्यातील 720 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सद्यस्थितीत 118 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आतापर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या :

आजरा- 79

भुदरगड- 76

चंदगड- 91

गडहिंग्लज- 104

गगनबावडा- 7

हातकणंगले- 16

कागल- 57

करवीर- 25

पन्हाळा- 29

राधानगरी- 69

शाहूवाडी- 186

शिरोळ- 8

नगरपरिषद क्षेत्र- 42

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47

एकूण 836, तसेच पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक- 4 आणि आंध्रप्रदेश-1, असे इतर जिल्हा व राज्यातील 14, असे मिळून एकूण 850 रुग्णांची संख्या जिल्ह्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.