ETV Bharat / briefs

लॉकडाऊन करा, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच - नागपूर महापौर - Nagpur Mayor Joshi support lockdown

संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. कारण कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी, असे जोशी म्हणाले.

Mayor Sandip joshi
Mayor Sandip joshi
author img

By

Published : Jul 12, 2020, 10:07 PM IST

Updated : Jul 12, 2020, 10:15 PM IST

नागपूर- बऱ्याच विषयावर महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात असलेले मतभेद जगजाहीर आहेत, मात्र पुन्हा नागपूर लॉकडाऊन करण्याच्या मुद्यांवर दोघांचेही एकमत झाल्याचे बघायला मिळत आहे. अर्थात हे होत असताना किंतु, परंतु आहेच.

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबीत शिथिलता दिली. त्याबरोबरच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे बंधन देखील घातले आहेत. मात्र नागपूरकरांनी सर्व दिशानिर्देशांना अक्षरशः तिलांजली देत नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे. त्यामुळेच काल महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा 'लॉकडाऊन' करण्याचा इशारा दिला आहे. याला नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी समर्थन दिले आहे. फक्त निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी विनंतीवजा सूचना संदीप जोशी यांनी केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर नागपुरात संचारबंदी लागू करावी लागेल, असा इशारा दिला होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात नागरिकांनी नियम पाळले नाहीत, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली, हे वास्तव आहे. आयुक्तांच्या या मताशी महापौर संदीप जोशी पूर्णतः सहमत असल्याचे म्हणाले आहेत.

लॉकडाऊन करा, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच - नागपूर महापौर

नागरिकांना जी सूट देण्यात आली, त्याचा गैरफायदा घेत सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे नुकसान होणार आहे. याची चाचपणी करण्यासाठी आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा, असे देखील जोशी म्हणाले.

जे व्यापारी नियम पाळत नाहीत अशा बाजारपेठामध्ये महापौर आणि आयुक्त संयुक्तरित्या फिरल्यास त्यातून एक वेगळा संदेश जाईल. परिणामही होईल. यामुळे कदाचित संचारबंदी लागू करण्याची वेळही येणार नाही. यानंतर जर परिस्थिती आटोक्याबाहेर जात असेल, तर निश्चितच संचारबंदीचा निर्णय घ्यायला हवा. परंतु हा निर्णय घेताना मनपा आयुक्तांनी या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला विश्वासात घ्यावे, असे जोशी म्हणाले.

तसेच, संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. कारण कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी. या कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही, तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे प्रशासनाच्या सोबत राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jul 12, 2020, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.