मुंबई - आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला नमवत चौथ्यांदा किताब पटकावला. या विजयानंतर मुंबई संघ पार्टीत धमाल करताना दिसून आला. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मुंबई इंडियन्स संघ आपल्या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन करत आहे. या व्हिडिओत कॅप्टन रोहित शर्मा आणि युवराज सिंगदेखील दिसत आहे.
या पार्टीत रोहित आणि युवी गली बॉय सिनेमातील गाण्यावर रॅपिंग करताना दिसत आहेत. गाण्याचे बोल रोहित बोलताना दिसतोय. तर युवराज यात रोहितची साथ देत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या पार्टीचा व्हिडिओ शेयर करताना कॅप्शन लिहिले आहे, की भारताला खऱ्या हिटमॅनची भेट करून द्या. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
रोहित शर्मा युवराजच्या गळ्याला पकडताना दिसून आला. मुंबईने युवराजला बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते. युवीला सुरुवातीचे केवळ ४ सामने खेळायला मिळाले. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. युवराज सिंहचा १२ वर्षांतला हा पहिला आयपीएल किताब आहे. याआधी युवराज बऱ्याच फ्रेंचाइजीसाठी खेळला आहे.