ETV Bharat / briefs

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेतला आढावा - Vijay wadettiwar corona review meeting

वडेट्टीवार यांनी कोरोना वार्डाबाहेर जाऊन त्याठिकाणीची पाहणी केली. यावेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रुपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

 विजय वडेट्टीवार
Vijay wadettiwar
author img

By

Published : Apr 30, 2021, 10:58 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी एकही खासगी रुग्णालय नसताना जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा देऊन, जिल्हा सामान्य रुग्णालयाने जिल्ह्याची गरज पूर्ण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे केले. कोरोनाबाबत सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते.

मंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सची उपलब्धता यावर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रुग्णांची प्रोटोकॉलनुसार तपासणी करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा टीम अतिशय चांगले कार्य करत असल्याचे मंत्र्यांनी यावेळी उद्गार काढले.

बैठकीमध्ये मंत्री वडेट्टीवार यांना कोविड परिस्थितीबाबतची माहिती डॉ.अनिल रूडे यांनी दिली. यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेड्डी पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीभाऊ मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, डॉ. मुकूंद ढबाले उपस्थित होते.

वडेट्टीवार यांनी कोरोना वार्डाबाहेर जाऊन त्याठिकाणीची पाहणी केली. यावेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरा आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील डबलींग रेटही खूप असून आपल्याला संसर्ग साखळी तोडण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेणे पण आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, जरी लसींचा पुरवठा कमी असला तरी जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी आहे. आता लोकांना लसीकरणाची गरज लक्षात आली आहे. लसींचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर जिल्ह्यातील लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.

चांगले जेवण व कूलरची व्यवस्था करा-

सद्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रुग्णांना चांगले जेवण व पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर्समध्ये कूलरची व्यवस्था करावी. तसेच चांगल्या दर्जाचे जेवणही पुरवावे. जेणेकरून रुग्णांना संसर्गातून बरे होण्यास मदत मिळेल, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील तापमान जास्त असल्यामुळे बहुतेक ठिकाणी काही अडचणही आल्या पण सद्या त्या दूर करत आहे. याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही करणेबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.

नागरिकांनी निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोर करावी -

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढली. ती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात आवश्यक निर्बंध घातलेले आहेत. याची अंमलबजावणी नागरिकांकडून होणे आवश्यक आहे. लोकांनी विनाकारण बाहेर न पडता आपली व आपल्या कुटंबांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.