ETV Bharat / briefs

अमेय म्हणतोय ...मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार - Amey Wagh

गर्लफ्रेंड चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेली काही दिवस अमेय वाघ वेगवेगळ्या पध्दतीने याचे प्रमोशन करत होता. आता त्याने मी गर्लफ्रेंड पटवणार हा ठाम निश्चय केला, हेच या टिझरमधून दिसते.

अमेय वाघ
author img

By

Published : May 16, 2019, 9:03 PM IST

हल्ली कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आपल्याला एक गर्लफ्रेंड असावी असे वाटते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आहे ही गोष्ट अलीकडे अतिशय कॉमन झाली आहे. मात्र एखाद्याला गर्लफ्रेंड नसेल तर त्याची त्याच्या ग्रुपमध्ये खिल्ली उडवली जाते किंवा तो मुलगा काहीसा निराश झालेला अनेकदा दिसतो. अशीच काही अवस्था ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याची झाली आहे आणि तो म्हणतोय ...मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात लेखक - दिग्दर्शक उपेंद्र सिधये आजच्या एका मुलाची कथा मांडणार आहे. पोस्टर नंतर आता ‘गर्लफ्रेंड’चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. जरा मदत हवीये तुमची ! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज !, त्यानंतर दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा! अशी पोस्ट अमेयने चित्रपटासाठी केल्याचे उघड झाल्यावर त्याची गर्लफ्रेंड कोण? असा विषय चर्चिला जात असतानाच नचिकेताला कुठे एखाद कपल दिसलं, तर ह्यांच्या अंगी निराशेची लहर संचार करते, त्यातून तो ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणार’ हा दृढनिश्चय नचिकेतने केला आहे, असे टिझरमध्ये दिसते.

आता खरोखर अमेय म्हणजेच नचिकेत प्रधानला गर्लफ्रेंड मिळणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे.

Intro:Body:

Ent 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.