ETV Bharat / briefs

मलाला ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी मिळवल्याचा आनंद करतेय साजरा

author img

By

Published : Jun 19, 2020, 7:12 PM IST

कुटुंबीयांसोबत फोटो घेत आणि केक कापत तिने पदवी मिळवल्याचा क्षण सेलिब्रेट केला. तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात तिने पदवी मिळवली आहे.

मलाला
मलाला

इस्लामाबाद - शिक्षण हक्क कार्यकर्ती आणि नोबेल पारितोषित विजेती मलाला यूसुफजई सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी मिळवल्याचा आनंद आपल्या कुटुबीयांसोबत साजरा करत आहे. तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात तिने पदवी मिळवली आहे.

मलाला पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात शाळेत असताना शिक्षण प्रसाराचे काम करत होती. तालिबानच्या महिलांच्या शिक्षणाला विरोध असतानाही ती काम करत होती. त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी शाळेत जाताना तिच्या मानेत गोळी झाडली. या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. आता मलाल परिवारासोबत इंग्लडमध्ये वास्तव्यास आहे.

कुटुंबीयांसोबत फोटो घेत आणि केक कापत तिने पदवी मिळवल्याचा क्षण सेलिब्रेट केला, असे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. माझा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. मी तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. मी पुढे काय करेल हे आता माहिती नाही. पण आता मी नेटफ्लिक्स पाहणे, वाचन आणि झोपणे एवढंच करणार असल्याचे, मलाला म्हणाली.

मलालाने 8 जूनला तिच्या पदवीबाबतची माहिती युट्यूबवरून दिली होती. #DearClassof2020 या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.