ETV Bharat / briefs

विश्वकरंडकाच्या इतिहासातील 'या' आहेत १० रंजक गोष्टी

author img

By

Published : May 17, 2019, 3:01 PM IST

नेदरलँडचे नोलान क्लार्क १९९६ च्या विश्वकरंडकात खेळणारे सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरले. यावेळी त्यांचे वय ४७ वर्ष २५७ दिवस होते.

विश्वकरंडकाच्या इतिहासातील 'या' आहेत १० रंजक गोष्टी

मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मेपासून आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यानिमित्त जाणून घेऊयात आतापर्यंत विश्वषकात झालेल्या १० रंजक गोष्टी...

  • विंडीजचे क्लाइव लायड (१९७५,१०७९) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिग (२००३, २००७) साली त्यांच्या नेतृत्वाखाली संघास विश्वकरंडक जिंकून दिला. दोनदा विश्वचषक जिंकून देणारे हे दोनच कर्णधार आहेत.
  • सलग ३ विश्वकरंडक जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण पाच वेळा विश्वकरंडकावर नाव कोरले आहे.
  • भारत एकमेव असा देश आहे ज्याने ६० आणि ५० षटकांच्या सामन्यात विश्वकरंडक जिंकला आहे. भारताने हा कारनामा १९८३ आणि २०११ साली केला.
  • भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी विश्वकरंडकात पहिल्यांदा हॅट्रीक साधली. त्यांनी १९८७ साली हा पराक्रम केला.
  • विश्वकरंडकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने सहा विश्वकरंडक स्पर्धेत २ हजार २७८ धावा केल्या आहेत.
  • न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर विश्वकरंडकात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आहे. मार्टिनने २०१५ सालीच्या विश्वकरंडकात विडिंज विरुद्ध २३७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
  • विश्वकरंडकात सर्वाधिक मोठी भागादारी रचण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युल्सने केला आहे. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ३७२ धावांची भागीदारी रचली.
  • ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथने सर्वाधिक ७१ गडी बाद केले आहेत.
  • विश्वकरंडात सर्वाधिक झेल आणि यष्टीचीत यष्टीरक्षक कुमार संगकाराने केले आहेत. झेल आणि यष्टीचीत मिळून ५४ फलंदाजांना संगकाराने माघारी धाडले आहेत.
  • नेदरलँडचे नोलान क्लार्क १९९६ च्या विश्वकरंडकात खेळणारे सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरले. यावेळी त्यांचे वय ४७ वर्ष २५७ दिवस होते.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.