ETV Bharat / briefs

ज्येष्ठांचा अपमान करणारं कारटं लोकसभेत नको; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

मोदींचे वटारलेले डोळे पाहून मुख्यमंत्री आणि सुजय दोघेही घाबरले असतील. सुजयला रात्री झोप आली नसेल, असे आव्हाड म्हणाले. राधाकृष्ण विखेंच्या संस्कारावच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुजय हे ज्येष्ठांचा अपमान करणारे कार्टे आहे. असले कार्टे लोकसभेत जाता कामा नये असे आव्हाड म्हणाले.

author img

By

Published : Apr 15, 2019, 12:30 PM IST

Updated : Apr 15, 2019, 12:43 PM IST

जितेंद्र आव्हाड

अहमदनगर - ज्येष्ठांचा अपमान करणारे कारटं लोकसभेत जात कामा नये. राधाकृष्ण विखेंनी मुलाला ज्येष्ठांचा सन्मान करायला शिकवले का हाच प्रश्न आता उपस्थित होतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. ते अहमदनगर येथे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

प्रचारसभेत बोलताना जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील
अहमदनगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा पार पडली. ही सभा व्यासपीठावरल्या घडामोडींनीच जास्त गाजली. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची नाराजी यावेळी स्पष्ट दिसून आली. तसेच, सुजय विखे यांनी ज्येष्ठ नेत्यांना भाषण आटोपण्यासाठी गडबड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय यांच्याकडे डोळे वटारुन पाहिल्याचीही भरपूर चर्चा झाली. हाच धागा पकडून आव्हाड यांनी विखेंवर टीका केली.

मोदींचे वटारलेले डोळे पाहून मुख्यमंत्री आणि सुजय दोघेही घाबरले असतील. सुजयला रात्री झोप आली नसेल, असे आव्हाड म्हणाले. राधाकृष्ण विखेंच्या संस्कारावच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुजय हे ज्येष्ठांचा अपमान करणारे कार्टे आहे. असले कार्टे लोकसभेत जाता कामा नये असे आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दुसऱ्या बाजूल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर निशाणा साधला. अहमदनगर जिल्ह्यातील साखळाई पाणी योजना कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण, भाजप सरकार ती पूर्ण करू शकले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येताच आम्ही ही योजना पूर्ण करु, असे आश्वासन पाटील यांनी दिले. या सभेला आमदार अरुण जगताप, राहुल जगताप, घनश्याम शेलार, शारदा लगड, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- मोदीं सभेतील सुजय विखेंच्या वागणूकिवर जितेंद्र आव्हाडांची फटकेबाजी.. दुसऱ्याचा अपमान करणारे कार्ट लोकसभेत जाता कामा नये.. -आव्हाडBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_14_april_ahm_trimukhe_1_ncp_rally_v

अहमदनगर- मोदीं सभेतील सुजय विखेंच्या वागणूकिवर जितेंद्र आव्हाडांची फटकेबाजी.. दुसऱ्याचा अपमान करणारे कार्ट लोकसभेत जाता कामा नये.. -आव्हाड

अहमदनगर- आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचारार्थ आयोजित वाळकी येथील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांना टीकेचे लक्ष्य करत जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळेस उपस्थित होते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नगरमध्ये पार पडली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र व्यासपीठावर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे मोदींच्या भाषणा पेक्षाही जास्त चर्चा खासदार दिलीप गांधी यांची नाराजी आणि सुजय विखे यांनी प्रमुख आणि जेष्ठ नेत्यांना भाषण आटोपते घेण्यासाठी केलेले प्रयत्न यावरून सध्या ही सभा सोशल माध्यमात चर्चेत आहे. याचा आधार घेत जितेंद्र आव्हाड यांनी डॉ सुजय यांना टीकेचं लक्ष्य केलं. व्यासपीठावरील मोदींचा चेहरा पाहता मुख्यमंत्रीही घाबरले असतील, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वटारलेले डोळे पाहून सुजय घाबरला असावा, त्यांना रात्री झोप आली की नाही असा मला प्रश्न पडला आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे संस्कार राधाकृष्ण विखे यांनी मुलांवर केलेत का असा प्रश्न पडण्याइतपत सध्या परिस्थिती समोर येत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितलं. त्यामुळे ज्येष्ठांचा अपमान करणार कार्ट लोकसभेत जाता कामा नये, त्याऐवजी नम्रता आणि सज्जनता याचे एक उदाहरण म्हणून समोर असलेले आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेत बहुमताने निवडून द्या असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले.

साखलाई योजना सध्या चर्चेत-
- आज वाळकी वाळकी येथे झालेल्या सभेत साखळाई पाणी योजनेबाबत मोठी चर्चा झाली. साखळाई पाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यापूर्वी भाजपाचे नाथाभाऊ खडसे यांनी ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र पाच वर्ष सरकार सत्तेत असतानाही योजना फडणीस यांना पूर्ण करता आली नाही आणि आता ऐन निवडणुकीच्या काळात केवळ याच मुद्द्यावर प्रचार करून मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा वाळकी येथे घेण्याचा घाट घातला आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मात्र येणारा सरकारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याने आम्ही त्या प्रश्नावर योग्य प्रकारे जनतेला न्याय देऊन त्यासाठी कोणतेही आंदोलन करण्याची गरज जनतेला भासणार नाही अशी ग्वाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली. आज झालेल्या सभेस आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, शारदा लगड, राजेंद्र फाळके आदी नेते उपस्थित होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मोदीं सभेतील सुजय विखेंच्या वागणूकिवर जितेंद्र आव्हाडांची फटकेबाजी.. दुसऱ्याचा अपमान करणारे कार्ट लोकसभेत जाता कामा नये.. -आव्हाड
Last Updated : Apr 15, 2019, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.