ETV Bharat / briefs

भांडुप येथील एमएसईबी कार्यालयाबाहेर जनता दलाचे आंदोलन, वीज बिलांची केली होळी

कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, उदरनिर्वाह कसा चालवायला, असा प्रश्न असतानाच ही बिले भरण्याचा तगादा सुरू झाल्याने लोकांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दरमहा 300 युनिटपर्यंतच्या वीज वापराची सर्व घरगुती ग्राहकांची देयके माफ करण्यात यावीत, अशी जनता दलाची मागणी असल्याचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

Janta dal protest
Janta dal protest
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:48 PM IST

मुंबई- दरमहा 300 यूनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावी, अशी मागणी करत आज जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने एमएसईबीच्या भांडुप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली.

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लाॅकडाऊनमुळे गरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांची 300 युनिटपर्यंतच्या वापराची वीज बिले माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी सोमवारी ईशान्य मुंबई जनता दलातर्फे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांच्या नेतृत्वाखाली भांडुप पश्चिम, लाल बहादुर शास्त्री मार्गावरील महावितरणच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लॉकडाऊनमुळे तीन महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असणाऱ्यांना बिल प्रश्न सतावत आहे. लाॅकडाऊन काही अंशी उठले असले, तरी अजूनही सर्वांची रोजीरोटी सुरू झालेली नाही. महावितरण, बेस्ट तसेच अदानी, टाटा पाॅवर या सारख्या वीज कंपन्यांनी मागील तीन ते चार महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली असून ती भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यभरातील जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मुंबईसारखे शहरही याला अपवाद नाही. या बिलातील 1 एप्रिलपासून लागू झालेल्या दरवाढीबाबतही लोकांच्या मनात नाराजी आहे. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, उदरनिर्वाह कसा चालवायला, असा प्रश्न असतानाच ही बिले भरण्याचा तगादा सुरू झाल्याने लोकांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दरमहा 300 युनिटपर्यंतच्या वीज वापराची सर्व घरगुती ग्राहकांची देयके माफ करण्यात यावीत, अशी जनता दलाची मागणी असल्याचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.